कुर्ला, मुंबई येथील एका विवाहित महिलेला मुल होण्यासाठी एकाने वाई, जि. सातारा येथील आपल्या बहिणीच्या घरी तसेच यवतमाळ, जि. यवतमाळ येथील चुलत्यांच्या घरी घेऊन जात आयुर्वेदिक औषध देण्याच्या आमिषाने त्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून विठ्ठल गणपत पवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
वाई : कुर्ला, मुंबई येथील एका विवाहित महिलेला मुल होण्यासाठी एकाने वाई, जि. सातारा येथील आपल्या बहिणीच्या घरी तसेच यवतमाळ, जि. यवतमाळ येथील चुलत्यांच्या घरी घेऊन जात आयुर्वेदिक औषध देण्याच्या आमिषाने त्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून विठ्ठल गणपत पवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुर्ला, मुंबई येथील एका बावीस वर्षीय महिलेला मुल होत नव्हते. त्यामुळे तिच्या सासरकडील कुटुंबियाच्या ओळखीचा असणारा विठ्ठल गणपत पवार (पूर्ण पत्ता माहीत नाही) याने मुल होण्यासाठी आयुर्वेदिक औषधे देण्याच्या बहाण्याने तिला दि. २ मार्च २०२१ ते दि. १९ जुन २०२१ या कालावधीत शिवसागर अपार्टमेंट, ब्राह्मणशाही, वाई ता. वाई, जि. सातारा येथे आपल्या बहिणीच्या घरी आणि यवतमाळ, जि. यवतमाळ येथे आपल्या चुलत्यांच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला डांबून ठेवून मारहाण करत तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी विठ्ठल पवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.


