maharashtra

महा राजस्व अभियानांतर्गत डिस्कळ येथे 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप


Distribution of ration cards to 374 beneficiaries at Diskal under Maha Revenue Abhiyan
महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसिल कार्यालय खटावच्या  वडूज  पुरवठा शाखा व ग्रामपंचायत डिस्कळ यांच्या संयुक्त विद्यमाने. महा राजस्व अभियानांतर्गत डिस्कळ येथे 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

पुसेगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसिल कार्यालय खटावच्या  वडूज  पुरवठा शाखा व ग्रामपंचायत डिस्कळ यांच्या संयुक्त विद्यमाने. महा राजस्व अभियानांतर्गत डिस्कळ येथे 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
तहसिलदार किरण जमदाडे यांच्या मागदर्शनखाली महसुल नायब तहसीलदार रविराज जाधव, पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, उपलेखापाल विक्रांत खडसे यांनी डिस्कळ येथे महाराजस्व अभियान राबवून लाभार्थ्यांची होणारी धावपळ कमी करून कार्यक्रमातच शिधापत्रिकेचे वाटप करून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हे सिद्ध करून दाखवले.  
या महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत नविन शुभ्र शिधापत्रिका 4, केशरी शिधापत्रिका 76, केशरी दुबार 80, पिवळी दुबार 2, शिधापत्रिकेत नाव वाढविणे 165, नाव कमी करणे 47 अशा 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप केले. यावेळी नायब तहसिलदार रविराज जाधव, पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, उपलेखापाल विक्रांत खडसे, मंडल अधिकारी अमृत नाळे, सरपंच डॉ. महेश पवार, उपसरपंच संदिप कर्णे, तलाठी अमोल जाधव. गणेश बोबडे, अमित हिरके, प्रीतम पडवळ, किशोर घनवट व रास्त भाव दुकानदार. सुखदेव रणसिंग, दादासो कदम, मनोहर लावंड. व तालुक्यातील दुकानदार उपस्थित होते.