विरमाडे, ता. सातारा गावच्या हद्दीतून शिवारात पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : विरमाडे, ता. सातारा गावच्या हद्दीतून शिवारात पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास विरमाडे, ता. सातारा येथील पीर नावाचा शिवारात पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. ११ बीएस ३२८७ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार नारायण बापु सोनवणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


