सातारा पालिकेच्या शहापूर पाणी योजनेच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करणाऱ्या सातारा इलेक्ट्रीकल्स या कंपनीच्या नावाखाली काम करणाऱ्या ठेकेदारास अखेर पालिकेच्या स्थायी समितीने काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठेकेदार आणि त्याच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी पालिकेच्या सभेत अनेकवेळा चर्चा झाली होती, मात्र तो ठेकेदार राजकीय वरदहस्ताच्या जोरावर आपल्यावरील बालंट टाळण्यात प्रत्येकवेळी यशस्वी होत असे.
एकीकडे कोरोना स्थितीने सर्वांना हैराण केले असतानाच गेल्या तब्बल चार महिन्यांपासून जलसंपदा सातारा येथील यांत्रिकी विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. यामुळे या सर्वांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून आमचे चार महिन्यांचे वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
सातारा जिह्यातील पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त रथोत्सव मिरवणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून निर्बंध लागू करत प्रवेश बंद व वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
सातारा नगरपालिका ही आदर्श नगरपालिका व्हायला हवी, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या मी तयार आहे, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले.
सतीश धुमाळचा पाठीराखा नक्की कोण ? सतीश धुमाळ सारखा भ्रष्ट अधिकारी पुनर्वसन विभागात असताना अनेक कामांत भ्रष्टाचार केला . भूसंपादन विभागात बदली झाल्यानंतर ही फक्त तडजोडी करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसे लुबाडण्याचा कायम प्रयत्नात असताना. धुमाळच्या या कर्मकांडाच्या बातम्याही माध्यमांतून प्रसिद्ध होत असूनही वरिष्ठ अधिकारी सतीश धुमाळच्या करणामांकडे सोईस्करपणे कानाडोळा करताना दिसत आहेत. दिलीप ननावरे यांच्या प्रकरणात धुमाळने कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बेकायदेशीर काम करत आहे. सतीश धुमाळवर कारवाई कोणाचा जीव गेलेवरच कारवाई होणार का असा प्रश्न जनमानसात उमटताना दिसत आहे.
दोन महिन्यांपासुन हरवलेल्या पित्याशी पुत्राची भेट घडवून आणण्यात १०८ रुग्णवाहिका चालकांना यश आले. मनोज पवार, रा. डी. पी. भोसले कॉलेज पाठीमागे, कोरेगाव, ता. कोरेगाव आणि अमोल चव्हाण, रा. महागाव, ता. सातारा अशी रुग्ण वाहिकाचालकांची नावे आहेत.
सातारा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) युवकाला मारहाण केल्याप्रकरणी राम हजारे (पूर्ण नाव नाही. रा. करंजे, सातारा) व त्याच्या दोन साथीदारांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कराड अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या तारण घर मिळकतीत घुसल्याप्रकरणी पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय दिघे, रंजना दिघे, विलास दिघे, सुनीता दिघे व विजय दिघे यांची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून या सर्वांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
विरमाडे, ता. सातारा गावच्या हद्दीतून शिवारात पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जगमीन, ता. सातारा येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्की टॉवरमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.