maharashtra

जीव गेलेवरच सतीश धुमाळवर  कारवाई होणार का?

धुमाळविरोधात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा, आळंदी-पंढरपूर महामार्गातील भूसंपादनात  भ्रष्टाचार

Will action be taken against Satish Dhumal only after someone death?
सतीश धुमाळचा पाठीराखा नक्की कोण ? सतीश धुमाळ सारखा भ्रष्ट अधिकारी पुनर्वसन विभागात असताना अनेक कामांत भ्रष्टाचार केला . भूसंपादन विभागात बदली झाल्यानंतर ही फक्त तडजोडी करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसे लुबाडण्याचा कायम प्रयत्नात असताना. धुमाळच्या या कर्मकांडाच्या  बातम्याही माध्यमांतून प्रसिद्ध होत असूनही  वरिष्ठ अधिकारी सतीश धुमाळच्या करणामांकडे सोईस्करपणे कानाडोळा करताना दिसत आहेत.  दिलीप ननावरे यांच्या प्रकरणात धुमाळने कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी  घेऊन बेकायदेशीर काम करत  आहे.  सतीश धुमाळवर कारवाई कोणाचा जीव गेलेवरच कारवाई होणार का असा प्रश्न  जनमानसात उमटताना दिसत आहे.

        भूसंपादन अधिकारी सतीश धुमाळ हे स्वतःला भ्रष्ट सिद्ध करण्यासाठी उतावळे असलेप्रमाणे रोज एक नवीन कारनामा समोर येताना दिसत आहे. आतापर्यन्त माध्यमे यावर बोलत असताना, आता शेतकऱ्याने सतीश धुमाळच्या कारभाराविरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. धुळदेव ता.फलटण येथील दिलीप गणपत ननावरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
        धुळदेव ता. फलटण येथील गट नं. २७ या मिळकतीचा फलटण व सातारा न्यायालयाने दिलीप ननावरे यांचा ताबा असल्याचा निकाल दिला आहे. सदरची जागा हि महामार्गाच्या कामात संपादित करण्यात आली आहे. मात्र तक्रारदार दिलीप ननावरे हे काही कामानिमित्त मुंबई येथे असताना सदर जमिनीची नुकसान भरपाई नंदकुमार कचरे यांना भूसंपादन अधिकारी सतीश धुमाळ यांनी वाटप केली आहे. तसेच सध्या यातीलच एस.आर. क्र. ९१४/९३२ मधील नुकसान भरपाई बाकी आहे. याबाबत ही हरकत चालू आहे. मात्र सतीश धुमाळ याने नंदकुमार कचरे याला हाताशी धरून सदर जमिनीत नसणारे बांधकाम व झाडे बेकायदेशीर दाखवून संबंधिताला नुकसान भरपाईपोटी अधिक रक्कम मिळावी यासाठी धुमाळचा प्रयत्न चालू आहे. यासाठी सतीश धुमाळने कृषी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागालाही हाताशी धरले आहे. मात्र संबंधित जमिनीचा ताबा हा तक्रारदार दिलीप ननावरे यांचा असून सतीश धुमाळ हे कचरे याला हाताशी धरून संबंधित रक्कम हडपण्याचा डाव रचत आहे. सदरचे प्रकरण हे गंभीर असून सतीश धुमाळ सारखा अधिकारी कचरे सारख्या लोकांना हाताशी धरून शासकीय पदाचा गैरवापर करत शासनाचीच फसवणूक करत आहे. त्यामुळे धुमाळची चौकशी करून सदर जमिनीचे फेर सर्वेक्षण करावे, अन्यथा २० जानेवारी रोजी फलटण तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार दिलीप धुमाळ यांनी दिला आहे.