सातारा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) युवकाला मारहाण केल्याप्रकरणी राम हजारे (पूर्ण नाव नाही. रा. करंजे, सातारा) व त्याच्या दोन साथीदारांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) युवकाला मारहाण केल्याप्रकरणी राम हजारे (पूर्ण नाव नाही. रा. करंजे, सातारा) व त्याच्या दोन साथीदारांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, समीर अयनाज पटेल (वय १९, रा. मालगाव, ता. सातारा) या युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्कशॉप क्रमांक दोनमध्ये 'तुला सोडून आम्ही मुद्दाम फिरायला गेलो होतो', असे म्हणून राम हा समीरला चिडवत होता. त्याला समीर हा 'तू गप्प बस' असे म्हटला आणि वर्कशॉपच्या बाहेर येवून थांबला. याचा राग आल्याने राम व त्याच्या दोन मित्रांनी समीर याला मारहाण केली. या मारहाणीत समीर जखमी झाला आहे. याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर राम आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार वायदंडे तपास करत आहेत.


