शेतकऱ्यांनी पिकवलेला फळे, भाजीपाला हा काही कालमर्यादे पुरताच टिकून राहतो. काल मर्यादा संपल्यानंतर त्यांचा माल हा खराब होतो व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. यामुळे शेतकऱ्यांना, देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.
सध्याच्या परिस्थितीत राजकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणातच आहेत. त्यामूळे दलित-बहुजनांनी उदासिनता झटकून राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.
येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'कराड गौरव पुरस्कार वितरण समारंभ व मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर 'रंगपट' या ग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्तिक सोहळा गुरुवारी 30 रोजी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे.
कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव ता. कराड येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, कराडचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामधील 26 हॉस्पिटल्स आरोग्य सेवा पुरवतात. यापैकी सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्या 3 हॉस्पिटल्सना गौरवण्यात आले.
साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची पदोन्नती झाली असून याबाबत राज्य शासनाने दि. 22 डिसेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी निवडश्रेणी संवर्गात पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीने त्यांची बदली पुणे जिल्ह्यात होण्याची शक्यता असून याबाबतचा आदेशही शासनाकडून पारित होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सातारा विभागातील 11 आगारातील सुमारे 397 कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले असून आजपर्यंत 95 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
दुचाकी चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून एक दुचाकी हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. साहिल संजय आवडे, वय १९, अआनुज विलास फाळके, वय १९ दोघेही रा. पाडळी (सातारारोड) ता. कोरेगाव अशी त्यांची नावे आहेत.
सोनगाव, ता. सातारा येथील मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कासच्या घनदाट जंगलात कमल कराडकर यांच्या तमाशा कलावंतांचा टेम्पोला (एम.एच ११ एम ४५८२) बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे व वेंगळे या ठिकाणी तमाशा कार्यक्रम आटूपुन कराडकडे परतत असताना अंधारी (ता.जावली) गावच्या वरील बाजूस ही दुर्घटना घडली.