सोनगाव, ता. सातारा येथील मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सोनगाव, ता. सातारा येथील मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी १ ते ९ वाजण्याच्या सुमारास सोनगाव, ता. सातारा येथील रहिवासी मनोहर सावंत यांच्या घरावर हल्ला करण्याचे उद्देशाने तेथीलच सरपंच पांडुरंग केशव नावडकर, उपसंरपच प्रकाश शंकर जाधव, ग्रामपंचायत कामगार किरण मोरे, मोहन नावडकर, चंद्रकांत मोरे हे आले. भुमिअभिलेख यांनी मोजुन दिलेल्या दगड खुणा उचलण्याच्या उद्देशाने मनोहर यांच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. या मारहाणीत मनोहर व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. यामुळे पाच जणांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालीही अटक झालेली नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल करत आहेत.


