सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, कराडचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामधील 26 हॉस्पिटल्स आरोग्य सेवा पुरवतात. यापैकी सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्या 3 हॉस्पिटल्सना गौरवण्यात आले.
कराड : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, कराडचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामधील 26 हॉस्पिटल्स आरोग्य सेवा पुरवतात. यापैकी सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्या 3 हॉस्पिटल्सना गौरवण्यात आले. सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या (एमजेपीजेएवाय) गुणवत्ता मापदंडास अनुसरून उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल सह्याद्रि हॉस्पिटलला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच कोविड-19 या जागतिक महामारीच्या काळामध्ये अतुलनीय धाडसी व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दलही हॉस्पिटलला स्वतंत्र प्रशस्तीपत्रकाद्वारे सन्मानित करण्यात आलेआहे.
या सत्कार समारंभाला सातारा जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सुभाष चव्हाण व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. देविदास बागल उपस्थित होते. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे व्यवस्थापक डॉ. वेंकटेश मुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी एमजेपीजेएवाय योजनेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राजश्री जगताप देखील उपस्थित होत्या.
गेली 12 वर्षे सह्याद्रि हॉस्पिटल हे कराड येथे वैद्यकीय सेवा पुरवित आहे. त्यापैकी सन 2014 पासून गेली 7 वर्षे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटल वैद्यकीय सेवा पुरवित असून आजपर्यंत सुमारे 11 हजार 603 पेक्षा अधिक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये 1 हजार 370 ओपन हार्ट सर्जरी, 3 हजार 500 अँजिओप्लास्टी, 1 हजार 900 मूत्रविकार शस्त्रक्रिया, 580 मेंदू व मणके शस्त्रक्रिया, 1 हजार ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, 1 हजार पेशंटचे डायलिसिस, 600 कर्करोग रूग्णांचे उपचार आणि 1 हजार 300 कोरोना रूग्णांचे उपचार आदी. शस्त्रक्रिया व उपचार या योजनेअंतर्गत झाले आहेत.
हा सन्मान मिळाल्याबद्दल सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे संचालक अमित चव्हाण, व्यवस्थापक डॉ. वेंकटेश मुळे यांनी समाधान व्यक्त करत ही वैद्यकीय सेवा अधिक व्यापक करण्याचा निश्चय असल्याचे सांगितले.