maharashtra

'कराड गौरव' पुरस्काराचा गुरूवारी वितरण सोहळा

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान : 'रंगपट' ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचेही आयोजन

'Karad Gaurav' award distribution ceremony on Thursday
येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'कराड गौरव पुरस्कार वितरण समारंभ व मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर  'रंगपट' या ग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्तिक सोहळा गुरुवारी 30 रोजी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे.

कराड : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'कराड गौरव पुरस्कार वितरण समारंभ व मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर  'रंगपट' या ग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्तिक सोहळा गुरुवारी 30 रोजी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे.
हा सोहळा ख्यातनाम साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (मुंबई) यांच्या शुभहस्ते संपूर्ण होणार असून कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खा. श्रीनिवास पाटील, तर अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, तसेच विख्यात साहित्यिक श्रीनिवास जी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पुरस्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा गुरुवारी 30 डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह, कराड येथे संपन्न होणार आहे. या समारंभास साहित्यप्रेमी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.