Satara

esahas.com

साताऱ्यात नाताळ सण उत्साहात साजरा

कोरोना आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या ओमायक्रॉन हे जागतिक महामारीचे संकट दुर कर अशी प्रार्थना आज ख्रिस्ती बांधवांनी येशुकडे करत साताऱ्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा केला. पोवई नाका येथील टिळक मेमोरियल चर्च आणि सदरबझार येथे असणाऱ्या चर्चमध्ये आज दिवसभर ख्रिस्ती बांधवांनी येशुचा आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केली होती.

esahas.com

वाहतूक पोलिसांच्या ‘दंड’गिरीने रिक्षाचालक हैराण

कोरोनाचा कहर संपल्यानंतर जगरहाटी सुरु झाली मात्र तोपर्यंत एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरु केलाय. त्यामुळे सातारा शहरात ग्रामीण भागातून येणारे तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असल्याने साताऱ्यातील रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस आलाय. मात्र, या स्थितीत देखील वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना नो एन्ट्री तर कधी कोणत्याही कारणातून थेट 500 रुपयांचा दंड ऑनलार्इन त्यांच्या वाहनावर टाकला जात आहे.

esahas.com

भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ देशात प्रथम

अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला.

esahas.com

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात शिंदे कुटुंबियांचे योगदान

शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले. परंतु, शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सैदापूर येथील धनाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले आहेत. न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या लढ्यात शिंदे कुटुंबियांचे महत्वाचे योगदान असल्याचे गौरोवोद्गार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काढले.

esahas.com

नेरळेला संरक्षक भिंत आणि घाट बांधणीसाठी भरीव निधी

गत पावसाळ्यासह त्याआधी एकदोनदा आलेल्या महापुराचा नेरळेला मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरांसह शेती आणि जनावरांचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याव्दारे लवकरच नदीकाठी संरक्षक भिंत आणि घाट तयार होऊन ग्रामस्थांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, असे प्रतिपादन यशराज देसाई यांनी केले.

esahas.com

कृष्णा'ची कोरोनाकाळातील कामगिरी कौतुकास्पद

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतली. आजपर्यंत सुमारे ८००० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.

esahas.com

सातारा शहर व वाई परिसर हद्दीतील 6 जण तडीपार

बेकायदेशीर कारवाया करणार्‍या आणि समाजाला त्रास देणार्‍या विविध गुन्ह्यातील सहाजणांना एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केला आहे.

esahas.com

वाढे येथे हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण; सहाजणांवर गुन्हा

सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका व्यावसायिकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला जखमी करत खिशातील अठरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देण्याची तसेच ही भांडणे सोडवायला गेलेल्या एका हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून जखमी करण्याची घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

दुचाकी-कारच्या अपघातात रंगकामगार जखमी

सातारा तालुक्यातील जिहे गावच्या हद्दीत रहिमतपूर - सातारा रस्त्यावर मुंढेवाडी बसस्थानकाजवळ एका चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी भीमराव देशमुख असे जखमीचे, तर वरद कालेकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, वरद याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.

esahas.com

जिल्ह्यात वेगवेगळ्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.