अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला.
सातारा : अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिल्ली येथील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्यामार्फत दि. ४ ते ७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ यांनी २५० पैकी २२४ मार्क्स मिळवून देशात प्रथम आल्या आहेत. अशाप्रकारचा बहुमान मिळणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या असून त्यांनी फिंगरप्रिंट विभागा मध्ये मानाची समजली जाणारी अजीज उल- हक ट्रॉफी तब्बल २० वर्षानंतर महाराष्ट्राला मिळवून दिली.
त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रियंका संकपाळ यांना पोलीस अधीक्षक अजय बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.