maharashtra

सातारा शहर व वाई परिसर हद्दीतील 6 जण तडीपार

सातारा पोलीस अधीक्षकांनी केले आदेश जारी

6 deported from Satara city and Wai area
बेकायदेशीर कारवाया करणार्‍या आणि समाजाला त्रास देणार्‍या विविध गुन्ह्यातील सहाजणांना एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केला आहे.

सातारा : बेकायदेशीर कारवाया करणार्‍या आणि समाजाला त्रास देणार्‍या विविध गुन्ह्यातील सहाजणांना एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केला आहे.
सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी, मारामारी, घरफोडी चोरी करणार्‍या टोळीचा प्रमुख सुरज राजु माने (वय 22), तेजस संतोष शिवपालक (वय 21, टोळी सदस्य- दोन्ही रा. लक्ष्मीटेकडी सदर बझार, सातारा. ता.जि. सातारा) या टोळीतील 2 जणांना हद्दपार करण्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. आर. मांजरे, यांनी प्रस्ताव सादर केला होता.
तसेच वाई, पाचगणी, भुईंज पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी करणार्‍या टोळीचा प्रमुख सनी उर्फ राहुल सुरेश जाधव (वय 26), टोळी सदस्य - सागर सुरेश जाधव (वय 24), अक्षय गोरख माळी (वय 19), सारंग ज्ञानेश्वर माने (वय 22, सर्व रा. गुरेबाझार झोपडपट्टी, सिध्दनाथवाडी वाई, ता.वाई, जि.सातारा) या टोळीतील 4 जणांना हद्दपार करण्याबाबत वाई पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी प्रस्ताव सादर केला होता.
या दोन्ही टोळ्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश केला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्विकारल्यापासुन 24 प्रस्तावातील बेकायदेशिर कारवाया करणार्‍या 88 जणांना हद्दपारीचे आदेश दिलेले आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक, अजित बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. आर. मांजरे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.ना.प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.काँ.अनुराधा सणस, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक फौजदार यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्वस्तरातुन समाधान व्यक्‍त होत आहे. अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.