सातारा तालुक्यातील जिहे गावच्या हद्दीत रहिमतपूर - सातारा रस्त्यावर मुंढेवाडी बसस्थानकाजवळ एका चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी भीमराव देशमुख असे जखमीचे, तर वरद कालेकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, वरद याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
सातारा : सातारा तालुक्यातील जिहे गावच्या हद्दीत रहिमतपूर - सातारा रस्त्यावर मुंढेवाडी बसस्थानकाजवळ एका चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी भीमराव देशमुख असे जखमीचे, तर वरद कालेकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, वरद याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, तानाजी भीमराव देशमुख (वय ४८, मूळ रा. जायगाव, ता. खटाव, जि. सातारा. सध्या रा. मोरया रेसिडेन्सी, सुर्यमुखी गणपतीजवळ, कोडोली, सातारा) हे कलरकाम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवार, दि. २१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरुन (एमएच ११ - सीझेड ८८३४) वरुन कोडोलीकडे येत होते. यावेळी सातारहून रहिमतपूरकडे वरद उमेश्वर कालेकर हा चारचाकी (एमएच १२ - एचव्ही ८५६९) घेवून निघाला होता. भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिली. यात तानाजी यांच्या उजव्या पायाला आणि गुडघ्याला तसेच उजव्या हाताच्या मनगटाला जोराचा मार लागला. यात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. याबाबतची तक्रार तानाजी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वरद कालेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.


