जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.
शंकर तुळशीराम शिंदे, रा. हणमंतवाडी, ता. फलटण यांनी राहत्या घरी दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर प्रथम बारामती येथे तद्नंतर फलटण येथील खासगी रुग्णालयात तेथून पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसर्या घटनेत अनिल नारायण देठे, वय 46, रा. बोरगाव काळे, ता. जि. लातुर यांना दि.23 रोजी पावणे पाच वाचण्यापूर्वी शेंदुरजणे येथे घाम येऊन चक्कर येऊन पडून त्यांचा मृत्यू झाल्याची खबर रामकृष्ण त्रिंबक चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात दिली.
तिसर्या घटनेत सुभाष राजाराम झुंजार, वय 51, रा. झुंजार वाडी हे कराड येथून झुंजार वाडीकडे दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या दुचाकीला साळिंदर आडवे येऊन झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
चौथ्या घटनेत शिंदी बुद्रुक येथे तेथीलच ज्ञानेश्वर बाबा निकम, वय 50 यांनी राहत्या घरात तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर बाबासो निकम यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली.


