maharashtra

दलित-बहुजनांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे : संसद मंडळाच्या बैठकीत आवाहन

Dalit-Bahujans should take active part in politics
सध्याच्या परिस्थितीत राजकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणातच आहेत. त्यामूळे  दलित-बहुजनांनी उदासिनता झटकून राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.

कराड : सध्याच्या परिस्थितीत राजकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणातच आहेत. त्यामूळे  दलित-बहुजनांनी उदासिनता झटकून राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.
दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने संयुक्त ' संसद मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रा. पुष्पलता सकटे, प्रकाशभाऊ वायदंडे, काशिनाथ सुलाखे-पाटील, शंकर महापूरे, बाबासाहेब दबडे, विकास बल्लाळ, विलास कांबळे, रमेश सातपुते, रामभाऊ दाभाडे, विकास लोंढे आदी. प्रमुख कार्यकर्ते आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारण केले आहे. शाहू महाराज तर राजेच होते. अण्णा भाऊ साठे यांनी देखील एक राजकीय भूमिका घेऊन राजकारण केले आहे. त्यामूळे दलितांनी राजकारणापासून दूर न राहता सक्रीय राजकरणात उतरले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, दलित महासंघाचे राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे यांनी दलित महासंघाला स्वतंत्र प्रदेशअध्यक्ष असावा, असे मत मांडून दलित महासंघाच्या घटनेत तशी दुरुस्ती करावी अशी सूचना केली. त्यानुसार घटना दुरुस्ती करून दलित महासंघाच्या प्रदेशअध्यक्षपदी अहमदनगरचे मा. काशिनाथ सुलाखे-पाटील यांची निवड करण्यात आली.
स्वागत प्रकाशभाऊ वायदंडे यांनी केले. रमेश सातपुते यांनी सूत्रसंचलन केले. तर दिलीप सकटे यांनी आभार मानले.