गत पावसाळ्यासह त्याआधी एकदोनदा आलेल्या महापुराचा नेरळेला मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरांसह शेती आणि जनावरांचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याव्दारे लवकरच नदीकाठी संरक्षक भिंत आणि घाट तयार होऊन ग्रामस्थांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, असे प्रतिपादन यशराज देसाई यांनी केले.
कराड : गत पावसाळ्यासह त्याआधी एकदोनदा आलेल्या महापुराचा नेरळेला मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरांसह शेती आणि जनावरांचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याव्दारे लवकरच नदीकाठी संरक्षक भिंत आणि घाट तयार होऊन ग्रामस्थांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, असे प्रतिपादन यशराज देसाई यांनी केले.
नेरळे ता. पाटण येथील कोयना नदीकाठी संरक्षक भिंत व नदीघाट बांधणी कामाचे भूमिपूजन यशराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, बशीर खोंदू, पांडूरंग शिरवाडकर यांच्यासह नेरळे ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
यशराज देसाई म्हणाले, गत पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा मोठा फटका बसला. याधीची काही वर्षात दोनदा आलेल्या महापुरातही लोकांच्या शेतीचे आणि जनावरांचे नुकसान झाले. महापुराचे पाणी नदीकाठच्या गावात शिरल्याने अनेकांच्या घरांचीही पडझड झाली. अशांना ना. शंभूराज देसाई यांनी शासनाच्या माध्यामातून वेळोवेळी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसारच नेरळे येथे कोयना नदीकाठी संरक्षक भिंत व नदीवर घाट बांधण्यासाठी ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. तसेच ना. देसाई तालुक्यातील गावांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत-जास्त निधी आण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यशराज देसाई यांच्या नेरळे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ना. शंभूराज देसाई यांनी नदीकाठी संरक्षक भिंत व नदीवर घाट बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्धल त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


