hugefundsforconstructionofprotectivewallandghatatnerle

esahas.com

नेरळेला संरक्षक भिंत आणि घाट बांधणीसाठी भरीव निधी

गत पावसाळ्यासह त्याआधी एकदोनदा आलेल्या महापुराचा नेरळेला मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरांसह शेती आणि जनावरांचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याव्दारे लवकरच नदीकाठी संरक्षक भिंत आणि घाट तयार होऊन ग्रामस्थांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, असे प्रतिपादन यशराज देसाई यांनी केले.