दुचाकी चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून एक दुचाकी हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. साहिल संजय आवडे, वय १९, अआनुज विलास फाळके, वय १९ दोघेही रा. पाडळी (सातारारोड) ता. कोरेगाव अशी त्यांची नावे आहेत.
सातारा : दुचाकी चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून एक दुचाकी हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. साहिल संजय आवडे, वय १९, अआनुज विलास फाळके, वय १९ दोघेही रा. पाडळी (सातारारोड) ता. कोरेगाव अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 डिसेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना बसस्थानकाजवळ एक युवक विना नंबरप्लेटच्या हिरो होंडा दुचाकीवरून फिरत असताना आढळून आला. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने त्याच्या मित्राकडुन ही दुचाकी चालवण्यासाठी घेतली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या मित्रास चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याच्या अन्य एका साथीदारासोबत दि. ४ रोजी पाडळी, सातारारोड येथील जरंडेश्वर मंदिराच्या पायथ्याला असणाऱ्या पार्किंग मधून ही दुचाकी चोरली असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एक दुचाकी हस्तगत करत अटक केलेल्या साहिल आवडे, आनुज फाळके यांना दुचाकीसह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, विक्रम माने, सागर गायकवाड, अभय साबळे, संतोष कचरे, पंकज ढाणे यांनी सहभाग घेतला.


