पुसेगांव येथील श्री सेवागिरी यात्रेनिमित्त रथोत्सव मिरवणूक रद्द
वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल
सातारा जिह्यातील पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त रथोत्सव मिरवणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून निर्बंध लागू करत प्रवेश बंद व वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
सातारा : सातारा जिह्यातील पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त रथोत्सव मिरवणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून निर्बंध लागू करत प्रवेश बंद व वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त मोठया संख्येने भाविक येतात. यावेळी रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने पुसेगाव येथे यात्रेसाठी दि. २८ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२१ पर्यंत गर्दी न करण्याचे आदेश लागू आहेत. दि. १ जानेवारी २०२१ हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी मंदिर व शिवाजी चौक येथे नियोजित स्थिर ठिकाणी रथात श्रीच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी खुल्या ठेवण्यात येणार आहेत.
प्रवेश बंद व नो पार्किंग
वडुज रोडवरील बंद राजवर्धन ढाब्याकडुन शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता राज्य परिवहन बसेसना वगळून सर्व वाहनांना प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा नो-पार्किंग झोन लागू करण्यात आलेला आहे. विसापूर फाट्याकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे. शिवराज मंगल कार्यालय, फलटण रोडकडून प्रस्तावित एस.टी.स्टँड, शिवाजी चौक पुसेगांव येथून दहिवडी, बाजुकडे फलटण, वडूज, व सेवागिरी मंदिरापासून दोन्ही बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किग झोन करण्यात आलेला आहे.
वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल
सातारा बाजुकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव येथून न जाता नेर, राजापूर, कुळकजाई मार्गे, दहिवडीकडे जातील. दहिवडी बाजूकडील येणारी वाहने कटगुण, खटाव, खातगुण, जाखणगांव मार्गे औध फाटय़ाकडे विसापूर मार्गे साताराकडे जातील.
वडूज बाजूकडील फलटण बाजुकडे जाणारी वाहने पुसेगावात ने येता खटाव, जाखणगाव, औध फाटा, नेर ललगुण मार्गे फलटणला जातील. तसेच फलटण बाजूकडील वडुज बाजुकडे जाणारी वाहने, नेर, ललगुण, औंध फाटा, जाखणगाव, खटाव मार्गे वडूजकडे जातील. दहिवडी ते डिस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी, राजापूर मार्गे जातील.