maharashtra

भटकंती मधून करिअर! महाराष्ट्र पर्यटन विभागाचे टूर गाईड बना

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश

Career from wandering! Become a tour guide of Maharashtra Tourism Department
स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील १४ प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश असणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालय पुणेच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी  दिली आहे.

सातारा : स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील १४ प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश असणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालय पुणेच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी  दिली आहे.
सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Indian Institute of Tourism and Travel Management), ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. ज्यात मुख्यतः स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हे तज्ञ प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.
पात्रता निकष वय मर्यादा: १८ वर्ष पुढील , वय वर्ष ४० खालील इच्छुकांसाठी किमान १२ वी उत्तीर्ण व वय वर्ष ४० वरील इच्छुकांसाठी किमान १० वी उत्तीर्ण, " आपल्या फिरस्तीची आवड एका स्थिर करिअरमध्ये बदलण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी  मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. आपणही इच्छुक असल्यास महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या https://www.maharashtratourism /web/mh tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज अर्ज करा. अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.