maharashtra

उंब्रज हद्दीतील दोन जण तडीपार


Two persons from Umbraj area were deported
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्याना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एका वर्षा करीता सातारा व सांगली जिह्यातून हद्दपार केले आहे.

सातारा : उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्याना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एका वर्षा करीता सातारा व सांगली जिह्यातून हद्दपार केले आहे.
मनोज मुरलीधर विभुते(वय 25, रा. उंब्रज), ज्ञानेश उद्धव चव्हाण (वय 24, रा. भवानवाडी) असे हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.  
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील हे सदस्य ज्ञानेश चव्हाण, मनोज विभुते यांना वेळेवेळी गुन्हे दाखल करून अटक केली. त्यांना सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. हे आरोपी नेहमी दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करीत होते. यामुळे उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी या आरोपीविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी ठोस भूमिका घेत आरोपी ज्ञानेश व मनोज याना एक वर्षासाठी सातारा व सांगली जिह्यातून हद्दपार केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्टेबल अनुराधा सणस, उंब्रज पोलीस ठाण्याचे  पोलीस हवालदार संजय देवकुळे यांनी योग्य पुरावा सादर केला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिह्याचा कार्यभार स्विकारल्यापासून 22 प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या 82 इसमांना हद्दपारीचे आदेश दिलेले आहेत.