कराड : मलकापूर, ता. कराड येथे घराच्या शेजारी लावलेल्या रिक्षावर ओरखडे ओढल्याचा राग मनात धरून लहान मुलीसह तिच्या आईला दगड मारून जखमी केले. सोमवारी 20 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी नयना युवराज गाडे (वय 28) रा. संस्कृती सिटी, मलकापूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अक्षय संजय कांबळे रा. जगदाळे मळा, मलकापूर असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर येथील संस्कृती सिटीमध्ये फिर्यादी राहणेस आहे. सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घराच्या शेजारी लावलेल्या रिक्षावर लहान मुलीने ओरखडे ओढल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी अक्षय कांबळे याने लहान मुलगी व तिची आई तक्रारदार नयना गाडे यांना दगड मारून जखमी केले. याबाबत गाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपी कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फडतरे करीत आहेत.


