तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करुन १ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना वाई येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
वाई : तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करुन १ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना वाई येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेली माहीती अशी, सुधाकर शंकर कुमावत, उपकोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय वाई,जि-सातारा वर्ग -२, मुळ रा. फ्लॅट नंबर- बी-२०१, विलास सोसायटी, ससाणे नगर, हडपसर, पुणे सध्या रा. गीतांजली हॉस्पिटल जवळ, वाई यांनी एका तक्रारदाराकडे त्यांचा तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढल्याचे कामाकरिता २ हजार रुपये रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. तक्रारीच्या अनुषंगाने २० डिसेंबर रोजी सापळा लावला असता सुधाकर शंकर कुमावत यांना आज एक हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले यांनी सहभाग घेतला.


