राजवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे लोकार्पण
हिंदुत्ववादी संघटनांचे कृत्य; विजय काटवटे यांच्यासह बारा जण ताब्यात
सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे आज येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक लोकार्पण करून त्यांच्या शिल्पावर दुग्धाभिषेक केला. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यासह बारा जणांना ताब्यात घेतले आहे.
सातारा : सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे आज येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक लोकार्पण करून त्यांच्या शिल्पावर दुग्धाभिषेक केला. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यासह बारा जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, राजवाडा परिसरात असणाऱ्या बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांची काही शिल्पे बसवण्यात आली आहेत. मात्र काही कारणानिमित्त ती शिल्पे प्लास्टिकच्या कागदांनी लपेटली होती. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते राजवाडा बसस्थानकामध्ये दाखल झाले. त्यांनी शिल्पांना लपेटलेली प्लास्टिकचे कागद काढून प्रथम शिल्पांवर पाण्याचा अभिषेक केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देण्यात येत होत्या. फटाक्यांची आतिषबाजीही यावेळी करण्यात आली. भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दुग्धाभिषेक केल्याची माहिती शाहुपुरी पोलिस ठाण्याला समजतात विजय काटवटे, मिलिंद एकबोटे यांच्यासह बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात घेऊन आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कारवाई सुरू होती.