maharashtra

सातारा जिल्हयात गारठा वाढला

तापमान घटल्यामुळे हुडहुडी

The hailstorm increased in Satara district
सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. उत्तर भारतातील वाढत्या थंडीच्या तीव्रतेने सातारकर गारठले असून उबदार स्वेटर कान टोपी जर्कीन यांचा वापर वाढला आहे .आज साताऱ्यात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. उत्तर भारतातील वाढत्या थंडीच्या तीव्रतेने सातारकर गारठले असून उबदार स्वेटर कान टोपी जर्कीन यांचा वापर वाढला आहे .आज साताऱ्यात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सातारा शहर परिसरात जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सातारा शहराचा पारा  सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्‍वर मध्ये सुध्दा पारा बारा अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने येथे येणारे पर्यटक सकाळी गुलाबी मात्र रात्री बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत पुढील 48 तास हा गारठा असाच कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे .येत्या दोन दिवसात आणखी तापमान उतरण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली असून वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
सातारा आणि परिसरात मंगळवारी 25.2 कमाल व 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून प्रचंड गारठा वाढला आहे. सकाळ, संध्याकाळच नव्हे तर दिवसभर थंडी जाणवत आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका वाढला असल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखीचा त्रास अनेकांना होत आहे. वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर, टोप्या, मफलर, कान टोप्या, उबदार जर्किन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसू लागला आहे.