"संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे. जोपर्यंत संतान हाताच्या आणि हाकेच्या अंतरावर आहे. तो पर्यंत ती सुधारु शकते. नाहीतर ती हाताबाहेर जाते." असा संदेश देणारा "आप्पा काळजी घ्या" या लघु चित्रपटाचे नुकतेच जळगाव येथील देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाले.
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक दर्शनी भागात का लावले नाहीत? याबाबत चौकशी करून, फलक न लावणाऱ्या पोलीस प्रमुखावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये; लाचखोराला कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी बदल होणंही आज काळाची गरज आहे. कारण लाचखोराला कडक शिक्षा; हाच मोठा उपाय, भविष्यातील अनेक लाचखोरी प्रकरणांना आळा घालणारा ठरू शकतो आणि राज्यात पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला थोडाफार का होईना उजाळा मिळू शकतो.
iPhone 14 मध्ये सध्याच्या iPhones वर 12MP वरून 48MP चा प्राथमिक कॅमेरा असणार आहे. आयफोन 15 हा पेरिस्कोप झूम लेन्स असलेला पहिला आयफोन असू शकतो. या सुधारणांमुळे कॅमेऱ्याच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे
पांढरीचीवाडी (तारुख) ता. कराड येथील धरे नावाच्या शिवारात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली. ऊसतोड मजुरांना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची पिल्ले सापडली. त्यांनतर याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनतर वनविभागाने बछड्यांची त्यांच्या आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक येथून पुणे येथे बंदी असतानाही बेकायदेशीरपणे, अवैधरित्या १७ लाख रुपयांचा विमल गुटखा एका टेम्पोमध्ये घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन तो गुटखा हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
अडीच वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात आलेल्या कोरोनाने अनेकांच्या आयुष्याची पुरती वाताहत केली. कोणाच्या कायमच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे व्यवसाय देशोधडीला लागले. लॉकडाउन नंतर लॉकडाउन झाल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबापासून कित्येक काळ दूर रहावे लागले. याच काळात सातारा जिल्ह्यात एका प्रेमी युगलाची अजब प्रेम की गजब कहानी सर्वांनाच पाहायला मिळाली.
येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोर असणाऱ्या कुलावंत ट्रॅक्टर ट्रॉली व ओमनी कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सुरेश बळीराम निकम रा. मिल्ट्री अपशिंगे, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा तालुक्यात दोन ठिकाणाहून ५५ हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी कॉपर कॉइल चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ दारू अड्डयावर छापा टाकून सुमारे १० हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
कास जलाशय येथून सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मुख्य पाइपलाइनला दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे सातारा येथील काही भागात दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. दि. ३ रोजी ही काही भागातील पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात अथवा न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांनी दिली.