पांढरीचीवाडी (तारुख) ता. कराड येथील धरे नावाच्या शिवारात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली. ऊसतोड मजुरांना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची पिल्ले सापडली. त्यांनतर याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनतर वनविभागाने बछड्यांची त्यांच्या आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कराड : पांढरीचीवाडी (तारुख) ता. कराड येथील धरे नावाच्या शिवारात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली. ऊसतोड मजुरांना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची पिल्ले सापडली. त्यांनतर याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनतर वनविभागाने बछड्यांची त्यांच्या आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे, वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचे बछडे ताब्यात घेतली. तसेच मादी बिबट्या जवळपासच असल्याने ती चिडून आक्रमक होऊ नये, यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सायंकाळी 6.30 वाजता त्याच शिवारात पुन्हा तिन्ही बछड्यांना एका क्रेटमध्ये घालून बाजूला कॅमेरे लावून ठेवण्यात आले. कॅमेरे लावत असताना बिबट्याच्या मादीने दर्शन देत ती आजूबाजूला घुटमळत राहिली. त्यामुळे बछडे कॅरेटमध्ये ठेवून कॅमेरा लावून वनविभागाचे अधिकारी तेथून निघाले.
या कार्यवाहीसाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.


