येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोर असणाऱ्या कुलावंत ट्रॅक्टर ट्रॉली व ओमनी कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सुरेश बळीराम निकम रा. मिल्ट्री अपशिंगे, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोर असणाऱ्या कुलावंत ट्रॅक्टर ट्रॉली व ओमनी कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सुरेश बळीराम निकम रा. मिल्ट्री अपशिंगे, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० रोजी १२. १० वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोरील पुलावर ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ५० सी १७९९ व ट्रॉली क्रमांक एम.एच. ५० एल ५७२३ हिला ओमनी कार क्रमांक एम.एच.११ बीएच ६४९७ वरील चालक सुरेश बळीराम निकम याने राणीला पाठीमागं येऊन धडक देऊन स्वतः गंभीर जखमी झाला. तसेच कारमधील महिला सुरेखा सुरेश निकम तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार अनिकेत रवींद्र माने, रा. चरेगाव, ता. कराड याने सातारा तालुका शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


