लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक गायब ? पोलीस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई होणार का?
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा प्रभावी करण्याची गरज
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक दर्शनी भागात का लावले नाहीत? याबाबत चौकशी करून, फलक न लावणाऱ्या पोलीस प्रमुखावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये; लाचखोराला कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी बदल होणंही आज काळाची गरज आहे. कारण लाचखोराला कडक शिक्षा; हाच मोठा उपाय, भविष्यातील अनेक लाचखोरी प्रकरणांना आळा घालणारा ठरू शकतो आणि राज्यात पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला थोडाफार का होईना उजाळा मिळू शकतो.
सातारा : राज्यात लाच घेण्यात पोलीस खाते अव्वल असताना याला पायबंद घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रयत्नशील आहे का? असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच घेणं जसा गुन्हा आहे; तसा लाच देणं हा देखील गुन्हा आहे; पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको तसेच अडकलेल्या काम पटकण व्हावे, यासाठी बहुतांश नागरिकही लाच देत असतात. यावेळी अपवाद सोडता एकही पोलीस अधिकारी व कर्मचारी लाच दिली जाते म्हणून एसीबीकडे तक्रार करायला पुढे सरसावताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलीस विभागात एखादा तरी अधिकारी व कर्मचारी प्रामाणिक आहे की, नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सामान्य जनतेलाही लाच घेणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची ? असा प्रश्न नेहमी सतावत असतो. त्यातच पोलिसांच्या विरोधात तक्रार करायची; तेही एका पोलिस विभागालाच! त्यामुळे काटेकोरपणे कारवाई होईल का? असा प्रश्नही सामान्य जनतेला पडलेला असतो. महत्त्वाचे म्हणजे जनतेला जागरूक करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारात दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक लावणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्याच्या आवारात असे, फलक लावलेले नाहीत कि; गायब झालेत? अशी परिस्थिती निदर्शनास येत आहे. त्यामुळे कर्तव्यदक्षपणाचा आव आणून नावलौकिकपणाचा बाऊ करणारे अपवाद काही पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या खाबूगिरीवर काळी चादर तर पांघरत नाहीत ना? असा संशय जागरूक नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
लाचखोर रंगेहात पकडण्यात यावा, म्हणून लाच घेते व देतेवेळी नोटांना फेनोल्फथेलिन किंवा अँथ्रासिन रसायनाची पावडर लावण्यात येते. ज्यावेळी आरोपी लाच स्वीकारतो त्यावेळी त्याचे हात सोडियम कार्बोनेट द्रावणात टाकल्यानंतर हात लालसर होतात. ही कारवाई पंचांसमक्ष होत असते. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा जरी असला तरीही आरोपींचे निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तक्रारदारही वेळ वाया जाऊ नये तसेच मानसिक त्रास नको म्हणून तक्रार देण्यास टाळाटाळ करत असतात.
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक दर्शनी भागात का लावले नाहीत? याबाबत चौकशी करून, फलक न लावणाऱ्या पोलीस प्रमुखावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये; लाचखोराला कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी बदल होणंही आज काळाची गरज आहे. कारण लाचखोराला कडक शिक्षा; हाच मोठा उपाय, भविष्यातील अनेक लाचखोरी प्रकरणांना आळा घालणारा ठरू शकतो आणि राज्यात पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला थोडाफार का होईना उजाळा मिळू शकतो.
- संतोष कदम, पाटण, सातारा जिल्हा
- मी पहिले चेक करतो आणि नंतर सांगतो
- अजित बोऱ्हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा
- लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे; याबाबचे संपर्क फलक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे - अशोक शिर्के, उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा