कास जलाशय येथून सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मुख्य पाइपलाइनला दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे सातारा येथील काही भागात दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. दि. ३ रोजी ही काही भागातील पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात अथवा न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांनी दिली.
सातारा : कास जलाशय येथून सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मुख्य पाइपलाइनला दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे सातारा येथील काही भागात दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. दि. ३ रोजी ही काही भागातील पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात अथवा न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांनी दिली.
कास जलाशयातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. कासाणी व आटाळी गावाजवळ मुख्य पाइपलाइनला दोन ठिकाणी गळती लागल्यामुळे गळती काढण्याचे काम उद्या बुधवार दि. २ फेब्रुवारी रोजी युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागणार असल्यामुळे दि. २ फेब्रुवारी रोजी पोळवस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळेवस्ती, जांभळेवाडा या परिसरात सायंकाळी सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही.
गुरुवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात पॉवर हाउस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, कोटेश्वर टाकी या माध्यमातून वितरण होणार या भागातील पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात अथवा न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन अभिजित बापट यांनी केले आहे.


