maharashtra

सातारा जिल्ह्यात ६ दारू अड्डयांवर छापे

सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Raids on 6 liquor dens in Satara district
सातारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ दारू अड्डयावर छापा टाकून सुमारे १० हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

सातारा : सातारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ दारू अड्डयावर छापा टाकून सुमारे १० हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोगराळे, ता. माण गावच्या हद्दीत घाटमाथ्यावर हॉटेल मल्हारच्या आडोशाला तेथीलच हेमलता उत्तम चव्हाण, वय ५८ या महिलेकडून ६६० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, सैदापूर, ता. कराड गावच्या हद्दीत बेघरवस्ती येथील तेथीलच ग्रामपंचायतीच्या पाठीमागे वत्सला राजाराम वाडकर वय ७० या महिलेकडून ६६० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील एका बँके शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच अनिल हरिभाऊ देशमुख वय ५५ याच्याकडून १ हजार १४० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
पिंगळी बुद्रुक, ता. माण गावच्या हद्दीत सम्राट धाब्याच्या पाठीमागे भिंतीच्या अडोषाला शशांक हणमंत जगदाळे वय २४,  रा. उकिर्डे, ता. माण याच्याकडून ८४० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, धनगरवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत दारूच्या दुकानाच्या पाठिमागे आडोशाला मनोज प्रकाश साळुंखे वय ३०, रा. देगाव, ता. सातारा आणि प्रशांत सर्जेराव किर्तीकुडव, रा. कोडोली, ता. सातारा याच्याकडून १ हजार ६८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, राजापूर, ता. खटाव गावच्या हद्दीत शेडच्या आडोशाला राजाराम रामा पांडेकर वय ७५, रा. कुळकजाई, ता. माण आणि संतोष पांडुरंग जाधव, रा. दहिवडी यांच्याकडून ५ हजार ८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.