maharashtra

सातारा येथे विमल गुटख्यासह २७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

दोन जणांसह टेम्पो ताब्यात;  गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Items worth Rs 27 lakh including Vimal Gutkha seized at Satara
कर्नाटक येथून पुणे येथे बंदी असतानाही बेकायदेशीरपणे, अवैधरित्या १७ लाख रुपयांचा विमल गुटखा एका टेम्पोमध्ये घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन तो गुटखा हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.

सातारा :  कर्नाटक येथून पुणे येथे बंदी असतानाही बेकायदेशीरपणे, अवैधरित्या १७ लाख रुपयांचा विमल गुटखा एका टेम्पोमध्ये घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन तो गुटखा हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. १७  लाख रुपयांच्या गुटख्यासह १० लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण २७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तो सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अजय बन्सल पुढे म्हणाले,  कर्नाटक येथून टेम्पो क्रमांक एम. एच. १२ एस.एक्स २७२६ मधून राज्य शासनाने बंदी घातलेला विमल गुटख्याचा मोठा साठा पुणे येथे घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणारे पोलीस ठाणे ते हॉटेल फुलोरा जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. संबंधित क्रमांकांचा टेम्पो येताच तो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये १७ लाख रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी शंकर केरु केदार वय ३८, सुभाष हरिभाऊ घुगे वय ६२ दोघेही रा. बालाजी नगर, धनकवडी पुणे यांना ताब्यात घेतले.१७  लाख रुपयांच्या गुटख्यासह १० लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण २७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संतोष जयसिंग कचरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.