आप्पा काळजी घ्या" लघुपटास जळगाव फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन
संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे
"संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे. जोपर्यंत संतान हाताच्या आणि हाकेच्या अंतरावर आहे. तो पर्यंत ती सुधारु शकते. नाहीतर ती हाताबाहेर जाते." असा संदेश देणारा "आप्पा काळजी घ्या" या लघु चित्रपटाचे नुकतेच जळगाव येथील देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाले.
"संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे. जोपर्यंत संतान हाताच्या आणि हाकेच्या अंतरावर आहे. तो पर्यंत ती सुधारु शकते. नाहीतर ती हाताबाहेर जाते." असा संदेश देणारा "आप्पा काळजी घ्या" या लघु चित्रपटाचे नुकतेच जळगाव येथील देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाले. या चित्रपटाचे निर्माते/ दिग्दर्शक मन्सूर मुल्ला. असून समाज प्रबोधन करणारा अध्यात्माची उत्कृष्ट झालर लागली असून कथा-पटकथा हृदयस्पर्शी संवाद शंकराव उमापे. यांनी लिहिले आहेत. आणि या चित्रपटात आप्पांची प्रमुख भूमिका उमापे यांचीच आहे. या चित्रपटात सदाशिव दाभाडे. यांनी लिहिलेले हृदयाला भिडणारे गीत समीर/ शाहरुख . यांनी गायले आहे. आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत समीर शाहरूक चाऊस यांनी दिले आहे. टीव्ही सिरीयल व चित्रपट अभिनेत्री नीलिमा कामाने. अभिनेते अंकुश कणसे. अजय पाटील. सविता खुंटाळे. अडीचशेहून अधिक नृत्य व अभिनयाचे पुरस्कार मिळवलेल्या ऐश्वर्या कदम. हिने ही उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. शिवराज फाटक. प्रेम पवेकर. मन्सूर मुल्ला. ह भ प सुरज महाराज अंतवडीकर भ प संजय महाराज चिखलीकर ह-भ-प बाजीराव दाभाडे रिसवडकर आणि हणबरवाडी चे माऊली कदम महाराज भजनी मंडळ. यांनी चित्रपटाला किर्तनाचा साज चढवला आहे. गणेश उमापे. क्रांती उमापे. अथर्व माने. जैद मुल्ला यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. प्रा. रत्नाकर मुळे सर प्रा. दिलीप माने सर प्रा. अमोल शेलार सर.प्रसाद कुंभार यांनीही विशेष भूमिका केल्या आहेत. रंगभूषा निलेश गव्हाळे यांची आहे. छायांकन व संकलन विकास काळे यांनी केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण हणबरवाडी व मसूर परिसरात झाले केदार पवार. सतीश कुमार देसाई. ग्रामस्थ भजनी मंडळ हणबरवाडी. गणेश खाडे (पुणे). उमेश कांबळे सौरभ कांबळे. सायली भोसले. अश्विनी कराळे. माननीय मानसिंगराव जगदाळे साहेब. शिवांजली फार्महाउस मसूर. यांचे विशेष सहकार्य मिळाले. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येऊन रसिकांच्या पसंतीस उतरेल