चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर घराघरात पाहिला जाणारा शो आहे. या शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात मात्र त्यासाठी भली मोठी रक्कम घेतात
चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर घराघरात पाहिला जाणारा शो आहे. या शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात मात्र त्यासाठी निर्मात्यांकडून भली मोठी रक्कम वसूल करतात.
प्रत्येक वीकेंडला लोक 'द कपिल शर्मा शो' या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. कपिलच्या शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांना खूप हसवतं, मग तो कृष्णा अभिषेक असो, किकू शारदा असो किंवा कपिल शर्मा स्वतः. हे सर्व स्टार्स त्यांच्या शानदार कॉमिक टायमिंगने लोकांचे खूप मनोरंजन करतात.
'द कपिल शर्मा शो'चे सर्व स्टार्स शोच्या निर्मात्यांकडून फी म्हणून मोठी रक्कम घेतात. या शोसाठी कोणत्या अभिनेत्याला किती फी मिळते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सर्वात आधी, प्रेक्षकांचा लाडका कॉमेडी किंग कपिल शर्माबद्दल बोलूया. 'द कपिल शर्मा शो'साठी कॉमेडियन कपिल शर्मा सर्वाधिक मानधन घेतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल 'द कपिल शर्मा शो'च्या प्रत्येक एपिसोडसाठी 50 लाख रुपये फी घेतो. तसंच, शोमध्ये सपनाची भूमिका करून लोकांचे मनोरंजन करणारा अभिनेता कृष्णा अभिषेक प्रत्येक एपिसोडसाठी निर्मात्यांकडून 10 ते 12 लाख रुपये घेतो.शोमध्ये जजच्या खुर्चीर बसणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंगची फीही कमी नाही. अर्चना प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपये फी घेते. तसंच चंदू चाय वालाची भूमिका करणारा चंदन प्रभाकर प्रत्येक एपिसोडसाठी ७ लाख रुपये घेतो.
शोमध्ये 'बच्चा यादव' ची प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारा कॉमेडियन किकू शारदा प्रत्येक एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेतो, तर सुमोना चक्रवर्तीची फी 5 ते 6 लाख रुपये आहे.