cineworld

सोनाक्षी सिन्हाला वॉरंट जारी? अभिनेत्री म्हणाली....


Warrant issued to Sonakshi Sinha? The actress said ....
सोनाक्षी सिन्हाला कोर्टाने पाठवलं वॉरंट, नक्की काय आहे प्रकरण, ज्यामुळे अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ...

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरूद्ध वॉरंट जारी केलं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद कोर्टाना सोनाक्षी सिन्हा विरोधात वॉरंट जारी केल्याचं वत्त समोर आलं. मुरादामधील इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी एका कार्याक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमात सोनाक्षीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं. पण कार्यमात निश्चित वेळी सोनाक्षी पोहोचली नसल्यामुळे शर्मायांनी कोर्टात धाव घेतली. याप्रकरणामुळे सोनाक्षी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

यावर सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठं वक्यव्य केलं आहे, ती म्हणाली, 'मला कोणतंही वॉरंट आलेलं नाही. माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकप्रियतेसाठी माझ्यानावाचा वापर सुरू आहे.'

सोनाक्षी पुढे म्हणाली, 'मी सध्या घरी आहे. माझी टीम या व्यक्तीवर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आवश्यक ती सर्व कारवाई करेल. जोपर्यंत मुरादाबाद न्यायालय प्रकरणाचा निकाल देत नाही तोपर्यंत माझं हेचं मत असेल, त्यामुळे कृपया यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका.'

काय आहे प्रकरण
एका कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये सोनाक्षीला बोलावण्यात आलं होतं. ठरलेल्या तरखेला सोनाक्षी पोहोचली नसल्यामुळे मॅनेजर शर्मा यांनी तिच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. पण सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. शर्मा यांनी सोनाक्षीसोबत संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

मुरादाबादच्या न्यायालयाने सोनाक्षीविरोधात वॉरंट जारी केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रमोद शर्मा यांनी 2018 मध्ये कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांवर 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.