cineworld

ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी रणबीर काय करतोय पाहिलं?


What did Ranbir do to fulfill Rishi Kapoor's last wish?
ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी रणबीर काय करतोय पाहिलं? भावना व्यक्त करताना अश्रू अनावर

जन्म आणि मृत्यू कोणाला माहिती नसतं. पण जन्म झाल्यानंतर मृत्यू येईपर्यंत फक्त आणि फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण कष्ट करत असतात. त्यापैकी एक म्हणजे, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर... सिनेमाची शुटिंग सुरू होती आणि त्यांची प्रकृती बिघडली... अखेर त्यांचं निधन झालं. जेव्हा ऋषी कपूर यांचं निधन झालं, तेव्हा ते ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) सिनेमांच शुटिंग सुरू होतं. 

त्यांच्या निधनानंतर सिनेमाची शुटिंग अपूर्ण राहिली. त्यांनंतर वडिलांची शेवटची इच्छा आणि सिनेमा पूर्ण करण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड प्रयत्न केले. रणबीरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 
व्हिडीओमध्ये तो म्हणतोय, 'शर्माजी नमकीन माझ्यासाठी फार खास आहे. शुटिंगच्या दरम्यान जेव्हा वडिलांची तब्येत बिघडली तेव्हा सिनेमा कोणत्याही प्रकारे पूर्ण व्हावा, अशी त्यांची इच्छा होती.

वडिलांच्या निधनानंतर सिनेमा कधीच पूर्ण होणार नाही असे क्षणभर वाटले. पण तुम्हाला माहिती असेल Show Must Go On... , आमच्यासाठी तो खूप कठीण काळ होता, मग परेश रावल यांनी वडिलांची भूमिका पूर्ण केली. फक्त त्यांच्यामुळे सिनेमा पू्र्ण झाला...

व्हिडीओमध्ये रणबीरने अनेक भावना व्यक्त केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे  ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.