सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका बॉस माझी लाडाची हि मालिका २८ फेब्रुवारी २०२२ पासून दररोज रात्री ८: ३० वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत .
मुंबई :
सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका बॉस माझी लाडाची हि मालिका २८ फेब्रुवारी २०२२ पासून दररोज रात्री ८: ३० वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत . त्याचबरोबर मराठी विश्वातील नावाजलेले कलाकार गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, माधवी जुवेकर हे या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती मनवा नाईक हिच्या स्ट्रॉबेरी यानिर्मिती संस्थेची ही मालिका आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. भाग्यश्रीने या आधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत . पण यावेळी मात्र ती एका स्ट्रिक्ट बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे . आयुष संजीव हा नवोदित कलाकार पहिल्यांदाच या मालिकेत मुख्य कलाकाराचे पात्र साकारत आहे . या मालिकेद्वारे ऑफिसमधील धमाल प्रेमकथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. घरातील बॉस हि नेहमी बायको असतेच पण जेव्हा तीच घरातील बॉस ऑफिसची हि बॉस असते , तेव्हा मात्र काही खरं नाही. बॉस राजेश्वरी आणि कर्मचारी मिहीर यांच्या प्रेमाची हि गोष्ट आहे . ज्यात त्यांचं एक छोटंसं आजी , आजोबा , काका , काकू , भावंडं असं गोड कुटुंब आहे . मालिकेच्या प्रोमोवर उत्तम प्रतिक्रिया आल्या असून सगळ्यांनाच ही नवी मालिका बघण्याची उत्सुकता आहे. २८ फेब्रुवारीपासून, दररोज रात्री ८:३० वाजता पाहायला विसरू नका बॉस माझी लाडाची फक्त सोनी मराठीवर