आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारा विनोदवीर काळाच्या पडद्याआड
गेल्या 41 दिवसांपासून मृत्यूच्या दारात असलेल्या विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची झुंज अपयशी ठरली आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण 41 दिवसांनंतरही त्यांनी शुद्ध आली नाही. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे.
संपूर्ण जगाला आपल्या विनोदाने हासवणाऱ्या विनोदवीराचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.