खोटी ॲट्रॉसिटी व गावावर दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ढाकणी, ता. माण येथील ग्रामस्थांची जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील रमाकांत टॉवर्स येथे सुरु असलेल्या बांधकाम साइटटवरुन लोखंडी साहित्य चोरुन नेणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्याकडून चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली आहे.
ऐतिहासिक मंगळवार तळे स्वच्छता मोहिमेला सोमवार पासून प्रारंभ झाला. तळ्यातील शेवाळलेले पाणी मोटारीद्वारे उपसून लगतच्या ओढ्यात सोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नगरसेवक वसंत लेवे मित्र समूहाच्या वतीने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व तंत्रनिकेतनसाठी भरीव निधी मंजूर करणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या मुलींच्या होस्टेलसाठी 9 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून असून पुढील वर्षापासून कराडमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
सरकार सर्वसामान्य लोकांसाठी, तसेच त्यांचा विकास करण्यासाठी असते. महाराष्ट्राचा विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री प्रयत्न करत आहेत. सरकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राजापूर, ता. खटाव गावच्या हद्दीत देवदरा नावाच्या शिवारात, असलेल्या शेडच्या आडोशाला अवैध दारू विक्रेता राजाराम रामा पांडेकर हा अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने, सपोनि. संदीप शितोळे यांनी पोलिस स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला.
मुलीच्या लग्नाकरता ४0 हजार रुपयांची गरज असल्याने फिर्यादीने चार महिन्याच्या मुदतीकरता मालगाव येथील एकाकडून १0 टक्के दराने पैसे घेतले. त्याचे ५५ हजार रुपये दिले. दरम्यान, फिर्यादीकडून आधारकार्ड झेरॉक्स, स्टेट बँकेचे दोन कोरे चेक घेतले ते पैसे पूर्ण देवूनही अद्यापपर्यंत परत दिले नाहीत.
माझ्या विरुध्द कोणी तक्रार दिली, असे विजय सखाराम यादव वय ३५ रा. सदरबझार, सातारा याने दारु पिऊन येत अर्वाच्च भाषा वापरली. ही घटना दि. २९ जानेवारी रोजी सदरबझार सातारा येथील पोलीस चौकीत पोलीस गुन्ह्याच्या अनुषंगाने काम करत असताना घडल्यानंतर त्याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सातारा-रहिमतपूर रस्त्यावर गोडोली परिसरात काही दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागली होती. त्या गळतीचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा त्याच जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ठेकेदाराच्या कामाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात साताऱ्यातील 50 हुन अधिक अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामध्ये वकील आणि डॉक्टर यांचीही विशेष उपस्थिती होती.