माझ्या विरुध्द कोणी तक्रार दिली, असे विजय सखाराम यादव वय ३५ रा. सदरबझार, सातारा याने दारु पिऊन येत अर्वाच्च भाषा वापरली. ही घटना दि. २९ जानेवारी रोजी सदरबझार सातारा येथील पोलीस चौकीत पोलीस गुन्ह्याच्या अनुषंगाने काम करत असताना घडल्यानंतर त्याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सातारा : माझ्या विरुध्द कोणी तक्रार दिली, असे विजय सखाराम यादव वय ३५ रा. सदरबझार, सातारा याने दारु पिऊन येत अर्वाच्च भाषा वापरली. ही घटना दि. २९ जानेवारी रोजी सदरबझार सातारा येथील पोलीस चौकीत पोलीस गुन्ह्याच्या अनुषंगाने काम करत असताना घडल्यानंतर त्याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, विजय सखाराम यादव याने सदर बझार पोलीस चौकी येथे तेथील तीन पोलीसांना अर्वाच्च भाषा वापरली. दरम्यान, तेथील टेबलावरील कागदपत्रे खाली फेकून देण्यात आल्याने त्याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सपोनि मोरे हे करत आहेत.


