कराडात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी
ना. उदय सामंत : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व तंत्रनिकेतनसाठी भरीव निधी मंजूर करण्याची ग्वाही
कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व तंत्रनिकेतनसाठी भरीव निधी मंजूर करणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या मुलींच्या होस्टेलसाठी 9 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून असून पुढील वर्षापासून कराडमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
कराड : कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व तंत्रनिकेतनसाठी भरीव निधी मंजूर करणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या मुलींच्या होस्टेलसाठी 9 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून असून पुढील वर्षापासून कराडमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, त्यांनी अभियांत्रिकी, फार्मसी व पॉलिटेक्निकल महाविद्यालयाचा एकत्रित आढावा घेतला.
ना. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शैक्षणिक व्यवस्था बळकट करण्याकडे लक्ष दिले आहे. राज्यभरातून अभ्यासक्रम बदलासह नवीन उपक्रमांची मागणी होत आहे. त्यानुसार पुढच्या वर्षीपासून कॉम्पुटर सायन्स इंजिनिअंरींग कोर्स सुरू करण्यात येत आहे. कराड इंजिनिअरींग कॉलेजकडून प्रस्ताव आल्यास कराडमध्येही हे सेंटर सुरू करण्याची मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, प्राचार्यांची सॅक्शनिंग अॅथॉरिटी 50 हजारापयर्र्ंत होती. मात्र, 50 हजारामध्ये कॉलेजमधील सुविधांचा खर्च अपूरा पडत असल्याने ही सॅक्शनिंग अॅथॉरिटी 3 लाख रूपये करण्यात आली आहे. तर जॉईंट डायरेक्टरना 5 लाख रूपये व डायरेक्टरना 10 लाख रूपये सॅक्शन अॅथॉरिटी मंजूर करण्यात आली आहे. मात्र या खर्चाचे ऑडिटही केले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कराडमधील शासकीय कॉलेजमधील कर्मचारी, तसेच सफाई कामगारांना किमान वेतनवाढीनुसार १ एप्रिलपासून वेतनात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या सफाई कामगारांना किमान ४ हजार रुपयांची पगारवाढ होणार आहे. अजूनही राज्यात काही महाविद्यालयात लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे लसीकरण त्या कॉलेजमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवत शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 15 फेब्रुवारी नंतर त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. या कॉलेजकडून एस्सी व एसटी वर्गातील मुलांसाठी हॉस्टेलची मागणी करण्यात आली आहे. यावर निर्णय घेऊन ते लवकरच उभा करण्यात येईल. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग कोर्स सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आजपासून राज्यातील महाविद्यालये सुरू
राज्यातील महाविद्यालय 1 फेब्रुवारीपासून) सुरू करण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्याच विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहे.


