राजापूर, ता. खटाव गावच्या हद्दीत देवदरा नावाच्या शिवारात, असलेल्या शेडच्या आडोशाला अवैध दारू विक्रेता राजाराम रामा पांडेकर हा अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने, सपोनि. संदीप शितोळे यांनी पोलिस स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला.
पुसेगाव : राजापूर, ता. खटाव गावच्या हद्दीत देवदरा नावाच्या शिवारात, असलेल्या शेडच्या आडोशाला अवैध दारू विक्रेता राजाराम रामा पांडेकर हा अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने, सपोनि. संदीप शितोळे यांनी पोलिस स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी राजाराम रामा पांडेकर आपल्या कब्जामध्ये अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात देशी-विदेशी दारू बाळगल्या स्थितीत मिळून आला, त्याच्याकडून देशी विदेशी दारू च्या एकूण 5080 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर पुसेगाव पोलीस स्टेशन ठाणे कडील अंमलदार पोलीस नाईक अशोक सरक यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे पुसेगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी. बी. बर्गे पुसेगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत. या कारवाईत डी बी पथकाचे कर्मचारी पोलीस हवालदार डी बी बर्गे, पोलीस नाईक अशोक सरक, सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल पुष्कराज जाधव यांनी सहभाग घेतला.