Satara

esahas.com

सातारा येथून दुचाकीची चोरी

येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणाऱ्या बालाजी धाब्याच्या समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात चार दारू अड्डयांवर छापे

सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ३२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

esahas.com

जिल्ह्यात चौदा जुगार अड्डयांवर छापे

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असणाऱ्या बारा जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १८ हजार ८०७ रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

esahas.com

देगाव फाटा परिसरातून मोबाइलची चोरी

देगाव फाटा, ता. सातारा परिसरातील एका चिकन सेंटरच्या समोरून एका महिलेचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

esahas.com

गर्दी मारामारी प्रकरणी १५ जणांवर गुन्हा

परळी, ता. सातारा येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर येऊन विद्युत पुरवठा आठ तासाऐवजी सहा तास करत अधून-मधून विद्युत पुरवठा बंद का करता अशी विचारणा करत गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी १५ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

esahas.com

कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू

कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

esahas.com

जिल्हादंडाधिकारी यांचे कोविड-१९ बाबत सुधारित आदेश

सातारा जिल्हयासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी कोविड-१९ बाबत सुधारित आदेश पारीत केले आहेत.

esahas.com

आरोग्य विभागाच्या घंटागाडी टेंडरची अजूनही प्रतीक्षा

सातारा शहराची हद्दवाढ होऊन सुमारे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही सातारा शहराच्या नवीन प्रभागात घंटागाडी सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याचे मूळ कारण आरोग्य विभागाचे घंटागाडीचे टेंडर प्रशासकीय घोळा मध्ये अडकून पडले आहे. फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असूनही अद्याप त्यावर सही झालेली नाही.

esahas.com

सातारा पालिकेकडून प्रभाग रचना आरक्षण गोपनीयतेचा भंग

सातारा नगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भात जी गोपनीयता बाळगायची आहे त्याचा सातारा नगर पालिका प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून गोपनीयता भंग झाल्याची तक्रार मंगळवार पेठ येथील रहिवासी हरी रामदास शिवशरण यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रकाद्वारे केली आहे. या गोपनीयता भंगाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

esahas.com

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर होता.