परळी, ता. सातारा येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर येऊन विद्युत पुरवठा आठ तासाऐवजी सहा तास करत अधून-मधून विद्युत पुरवठा बंद का करता अशी विचारणा करत गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी १५ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सातारा : परळी, ता. सातारा येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर येऊन विद्युत पुरवठा आठ तासाऐवजी सहा तास करत अधून-मधून विद्युत पुरवठा बंद का करता अशी विचारणा करत गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी १५ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास परळी येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर आबंवडे खुर्द, ता. सातारा येथील उपसरपंच अनिल बबन माने शंकर भगवान माने हणमंत गुजर यांच्यासह १५ जण आले. शेती पंपाचा विद्युत पुरवठा आठ तासाऐवजी सहा तास का केला? त्यामध्येही तुम्ही अधून मधून विद्युतपुरवठा बंद का करता, असा जाब विचारत कर्मचारी मोहन मुन्नीलाल ओझा वय ४७, रा. परळी, ता. सातारा यांना दमदाटी करून गर्दी, मारामारी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


