Satara

esahas.com

फलटण तालुक्यात वाळु तस्करांवर मोठी कारवाई

फलटण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई करत सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून १० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी प्रशांत सतीश भिसे वय १९, महेश उर्फ अक्षय विकास गायकवाड वय २६, आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.

esahas.com

जिल्ह्यात चार दारू अड्डयांवर छापे

सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ६८० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

esahas.com

जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता यंत्रणेवर ताण

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयाच्या 19 विभागातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून पुरेशा स्वच्छते अभावी रुग्णांची ससेहोलपट वाढली आहे. कारण रुग्णालयाला सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक ब्रेक देण्यात आल्याने स्वच्छता यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

esahas.com

पुसेगावमधील महामार्गाचे काम सुरू करा, अन्यथा रस्ता रोको : डॉ. सुरेश जाधव

पुसेगाव : पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पोलीस स्टेशन ते येरळा नदीपर्यंत अनेक दिवसांपासून रखडले आहे. सदरचा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. पुसेगाव मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा प्रशासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदारच्या विरोधात दि. १० फेब्रुवारी रोजी पुसेगाव येथील छ. शि...

esahas.com

पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो अनर्थ टळला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फेटाळून लावले आहेत.

esahas.com

टपाल विभागाच्या वतीने असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड सुविधा

केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी व शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड (श्रमिक कार्ड) द्वारे नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी टपाल विभागाद्वारे असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करून ई-श्रम कार्ड देण्यात येणार असल्याचे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षका अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

esahas.com

त्यांना जॅकेटमुळे मिळाले सुरक्षा कवच !

कोयना धरणाचे बॅक वाटर असणाऱ्या शिवसागर जलाशयातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांची विदारक परिस्थिती समोर आल्यानंतर महिला आयोगासह न्यायालयही अलर्ट झाले. तथापि, शासनस्तरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी झाली नाही. सातारचे सामाजिक कार्यात निस्वार्थपणे अग्रेसर असणारे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मात्र उत्तम दर्जाचे सेफ्टी लाईफ जॅकेट प्रत्यक्ष त्या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेट दिले.

esahas.com

कराडात दोन व्यवसायिकांना मारहाण करून लुट

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणानजीक दोघांनी दोन व्यावसायिकांना लुटल्याची घटना घडली. त्यांनी सोमवारी 31 रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास या व्यावसायिकांना मारहाण करून पैशाची मागणी केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या खिशातून व गल्ल्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा येथून दुचाकीची चोरी

येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणाऱ्या बालाजी धाब्याच्या समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात चार दारू अड्डयांवर छापे

सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ३२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.