maharashtra

जिल्ह्यात चार दारू अड्डयांवर छापे


Raids on four liquor dens in the district
सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ६८० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

सातारा : सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ६८० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खटकेवस्ती, ता. फलटण गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला तेथीलच दिलीप गणपती मदने याच्याकडून ५१० रुपये किमतीच्या ९, गुणवरे, ता. फलटण गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला तेथीलच विलास आनंदा जाधव  याच्याकडून ५७० रुपये किमतीच्या १० देशी दारूच्या बाटल्या, लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीत तेथीलच अर्जुन पवार त्याच्याकडून ९०० रुपये किमतीची  पाच लिटर गाडी, फलटण,, ता. फलटण येथे रविवार पेठेत घराच्या आडोशाला तेथीलच महेंद्र आबाजी काकडे  याच्याकडून ३६० रुपये किमतीची पाच लिटर ताडी, फलटण येथील सोमवार पेठेतील  एका मंदिर परिसरात तेथीलच रविराज गंगाराम पवार याच्याकडून ६५० रुपये किमतीची पाच लिटर गाडी हस्तगत करण्यात आली.
दहिवडी, ता. माण गावच्या हद्दीत शबनम हॉटेलच्या समोरील चहाच्या टपरीच्या आडोशाला तेथीलच जबीर हजरत मुलाणी याच्याकडून ८४० रुपये, आर्वी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत तेथीलच सूर्यकांत किसन दळवी याच्याकडून ९०० रुपये, फलटण येथील मंगळवार पेठेतील पाण्याच्या टाकीखाली झुडपाच्या आडोशाला अंकुश अशोक नेवसे याच्याकडून ३५५ रुपये सासवड, ता. फलटण येथे राजा शिंदे याच्याकडून १ हजार ६२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आले.