maharashtra

कराडात दोन व्यवसायिकांना मारहाण करून लुट

दोघांवर गुन्हा दाखल

In Karad, two businessmen were beaten and robbed
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणानजीक दोघांनी दोन व्यावसायिकांना लुटल्याची घटना घडली. त्यांनी सोमवारी 31 रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास या व्यावसायिकांना मारहाण करून पैशाची मागणी केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या खिशातून व गल्ल्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणानजीक दोघांनी दोन व्यावसायिकांना लुटल्याची घटना घडली. त्यांनी सोमवारी 31 रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास या व्यावसायिकांना मारहाण करून पैशाची मागणी केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या खिशातून व गल्ल्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीधर थोरवडे व अताष थोरवडे दोघेही रा. बुधवार पेठ, कराड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणानजीक गुरुशांत ऑटोसमोर संशयितांनी आकाश माने व त्याचा कामगार राम नयन प्रजापती यांना शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करत त्यांना मारहाणही केली. शिवाय, संशयितांनी आकाश माने यांच्या शर्टच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर दोन्ही संशयितांनी तेथून जवळच असलेल्या धनतेज शशिकांत कांबळे यास व त्याची आई सौ. स्वाती कांबळे यांना मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच संशयितांनी चिंतामणी स्नॅक्स सेंटर दुकानाच्या गल्यातील 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचबरोबर त्यांनी संबंधित व्यवसायिकांना याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास तुम्हाला सोडणार नाही, असा दमही दिला.
याप्रकरणी मंगळवारी 1 रोजी आकाश शंकर माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित श्रीधर थोरवडे व अताष थोरवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे अधिक तपास करत आहेत.