maharashtra

युवतीचा मोबाईल हिसकावून पळवून नेणाऱ्या एकाला अटक

दुचाकी हस्तगत; एका अल्पवयीन मुलाचा समावेश

Man arrested for snatching girl's mobile phone
दि. २४ जानेवारी २०२२ रोजी देगाव फाटा, ता. सातारा येथे एक युवती मोबाईलवर बोलत पायी चालत जात तिचा मोबाईल हिसकावून हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा युवकापैकी एकाला अटक करण्यात सातारा शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले.

सातारा : दि. २४ जानेवारी २०२२ रोजी देगाव फाटा, ता. सातारा येथे एक युवती मोबाईलवर बोलत पायी चालत जात तिचा मोबाईल हिसकावून हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा युवकापैकी एकाला अटक करण्यात सातारा शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले. अक्षय सुर्यकांत पवार वय २३, रा. मस्करवाडी, ता. सातारा असे त्याचे नाव असून या चोरी प्रकरणात एका अल्पवयीन बालकाचा समावेश असुन या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२४ जानेवारी २०२२ रोजी देगाव फाटा, ता. सातारा येथे एक युवती मोबाईलवर बोलत पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी तिचा मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिल्या होत्या.
या चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत असताना पथकाने रेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेऊन तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले. दरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल मित्राकडून विकत घेतल्याचे सांगितले.
पथकाने तात्काळ त्याच्या मित्राचा ठावठिकाणा घेऊन माहिती प्राप्त करून त्यास अटक केली. अक्षय सुर्यकांत पवार वय २३, रा. मस्करवाडी, ता. सातारा असे त्याचे नाव असून संबंधित हा जबरी चोरीचे गुन्हे करणारा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर यापूर्वी सातारा शहर, वाई अशा ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. मोबाइल चोरी प्रकरणात वापरलेली दुचाकीला त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. या चोरी प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.