वाढे, ता. सातारा या गावात राहत असलेले प्रमोद रामचंद्र नलवडे (वय 51) हे रस्त्याने जात असताना याच गावातील नलवडे कुटुंबातील सदस्यांनी अडवणूक करून मारहाण केल्याने परस्पर विरोधी तक्रारी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
केवायसी अपडेट करून देतो, असे भासवत अज्ञात चोरट्याने सिकंदर बाबुलाल मुलाणी (वय 34, मुळ रा. वडी ता. खटाव) यांच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढून दीड लाखांची फसवणूक केली आहे. अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या असून वारंवार पोलीसांकडून आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या कारणाने चौघांचा मृत्यू झाला आहे.
पंडित ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालमत्ता आणि जागा याचा लिलाव आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. तो अत्यंत बेकायदेशीर स्वरूपाचा आहे. या प्रक्रियेला कामगार संघटनेने उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह सर्विसेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार तळे संपूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर या तळ्याच्या संरक्षणासाठी प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. तळ्याच्या संरक्षक भिंतीची पडझड होत असल्याने पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने तळ्याच्या बाजूने चेनलिंक जाळी बसवण्याचा प्रस्ताव लेवे यांनी नगरपालिकेला सादर केला आहे
वारकरी संप्रदाय चे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी सातार्यात राज्य सरकारवर वेगवेगळ्या आरोपांची राळ उडवून दिली. शासनाचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला असे आहे. यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि त्यांना ज्याला गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करुन योजनेच्या उर्वरित कामासाठी ६९७ कोटींचा निधी मिळण्यासाठी तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देशामध्यें बेरोजगारी कमी होऊन मोठ्या प्रमाणात लघु तसेच सुष्म उदयोग वाढीसाठी PMEGP आणि CMEGP या कर्ज योजना सुरु केल्या परंतु त्यास सरकारी बँका आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून या योजना राबवण्यात उदासीनता दिसून येत आहे. या योजनांचे सुरुवातीचे काळात मोठ्या प्रमाणात यश आले परंतु हल्लीचे काळात शेकडो अर्ज येतात त्यास जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजुरी पण मिळते पण बँकांकडून कोणत्याही तारणाची अट नसताना बँक तारण नाही किंवा उद्योजकाचा इनकम कमी आहे अशी तकालातु करणे देऊन वित्तपुरवठा करण्यास टाळाटाळ करतात.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीला मान्यता आहे का? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकाचे मनात येतात यावर विस्तृत माहिती